


पनवेल- वार्ताहर
कोरोना ने सर्व जग भरात हाहाकार पसरविला आहे व त्यामुळे लॉक डाऊन हे दिवसेंदिवस वाढतच गेले असे असताना बऱ्याच लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर अनेक लोकां च्या नोकऱ्या ही गेल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे महामारी तर पसरली आहेच त्याबरोबर बेरोजगारी ही बघायला मिळते. अश्या परिस्थिती मध्ये कुणीही पैशा अभावी
शिक्षणा पासून वंचित राहू नये व सरकार कडून पालकांना दिलासा मिळावा या करिता कळंबोली विकास कृती समितीने कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळावधीतील पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळेय फी माफ करण्याबाबत आपल्या राज्याच्या आदरणीय शिक्षणमंत्री मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या कडे मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी ‘स्वाक्षरी मोहीम’ ही राबविली आहे.
पालकांनी या स्वाक्षरी मोहीमे ला चांगला प्रतिसाद ही दिला आहे व लाॅकडाऊन मुळे जे पालक स्वाक्षरी करु शकले नाहीत आणि जे पालक गावी गेले आहेत अशा पालकांनी आदरणीय शिक्षणमंत्री मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना त्यांच्या या min.sedu@maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर लाॅकडाऊनच्या कालावधीतील फी माफ करण्याबाबत विनंती करावी असे आव्हान कळंबोली विकास कृती समिती तर्फे सर्व पालकांना करण्यात आले आहे. या बाबतचे सविस्तर पत्र गटशिक्षणाधिकारी यांना व अन्य संबंधित कार्यालयीन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे याबाबत आपण सतत पाठपुरावा चालु ठेवणार आहोत असे कृती समितीचे अध्यक्ष श्री विजय गर्जे यांनी सांगितले आहे.













































You must be logged in to post a comment.