लेखक: जनहित न्यूज महाराष्ट्र
-
जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ मधील प्रभाग क्रमांक 44 मध्ये राहत असलेल्या श्रीमती शालिनी दिनकर बागराव यांची मुलगी कुमारी श्रद्धा दिनकर बागराव. हिने मार्च महिन्यात ……………………..M P S C राज्यसेवा परीक्षा-2019 मध्ये चांगल्या गुणांनी उतिर्न झाल्याने महाराष्ट्र सरकार च्या. महसूल विभागात तालुक्यात महत्त्वाच्या तहसीलदार ह्या पदी निवड झाली आहे …………………………..आज दिनांक 21 जून 2020 रोजी अंबरनाथ चे शिवसेना नगरसेवक मा. सुभाष साळुंके आणि संवाद फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ सुवर्णा साळुंके यांनी कुमारी श्रद्धा हीला घरी जाऊन भेट दिली व सत्कार करून अभिनंदन व कौतुक केले…………………………… वडिलांचे छत्र हरपल्या नंतर श्रद्धा च्या. आई ने मुलांच्या शिक्षणा साठी प्रचंड परिश्रम घेतले मुलांनीही आई च्या. विस्वसाला पात्र ठरून सातत्याने प्रयत्न केले आज कु. श्रद्धा ही तहसीलदार पदावर विराजमान होत आहे नगरसेवक सुभाष साळुंके आणि सुवर्णा साळुंके यांनी श्रद्धा हिला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या…………….. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ





अंबरनाथ मधील वडवली सेक्शन येथे राहणारी कु. श्रद्धा दिनकर बागराव हिला ४ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर एमपीएससी – राज्यसेवा परीक्षा -२०१९ मध्ये यश मिळाले असून तिची तहसीलदार पदी निवड झाली आहे. कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता स्व-मेहनतीवर तिने हे यश संपादन केले आहे.
वयाच्या ५ व्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर श्रद्धाची आई शालिनी दिनकर बागराव यांनी अतिशय हिंमतीने आणि मेहनतीने मुलांचे शिक्षण पूर्ण केले. शालिनी बागराव ह्या जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी असून मुलीच्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
आपले व आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या श्रद्धाने स्पर्धा परीक्षांमध्ये प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांना संदेश दिला आहे की जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही ध्येय गाठणे शक्य आहे.
-




-
*कोविड 19 च्या अनलॉक पार्श्वभूमीवर* *प्रशासन व नागरिकाची बेफीकीरी* ✍🏻✍🏻 उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरसह कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त झपाट्याने वाढतच आहेत.


*कोविड 19 च्या अनलॉक पार्श्वभूमीवर*
*प्रशासन व नागरिकाची बेफीकीरी* ✍🏻✍🏻उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरसह कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त झपाट्याने वाढतच आहेत. लॉक डाऊन शिथिल केल्यानंतर रस्त्यावर होणारी गर्दी, सम विषम दिनक्रम आखून, नियम मर्यादा ठेवून प्रशासन, व्यापारी संघटना, आणि ग्राहकांना विचारात घेऊन घेतलेले निर्णय घातक ठरू लागले आहेत. दररोज कोरोना रुग्णाची संख्या भरमसाठ वाढतच आहे. प्रशासनाला नियंत्रण राखणे अपेक्षीत असताना कोणतेही कठोर व कडक नियम पालन होत नसल्याचे दिसत आहे . दारू विक्री हि ऑनलाईन असताना खुलेआम दुकानात काऊंटरवर बिअर विस्की सारखे बिनधास्त लोक खरेदी करताना दिसतात. याबाबत तक्रार केली तर तेवढाच वेळ नाटक करून बंद करणार आणि काही तासांनी पुन्हा सूरू. याला जबाबदार कोण ?
लॉकडाऊन काळात सगळे घरातच होते. एक रूग्ण जरी आढळून आला तर तो विभाग आणि एरिया पूर्ण प्रतिबंध केला जात होता. आता तर एका सोसायटीत दोन ते चार आढळून येतात पण तो विभाग पूर्णपणे मोकळा ठेवला जातो. कोणतेही फलक, नोटीस वा माहिती प्रशासन देत नाही. नागरीक बेभानपणे वावरतात आणि येणाऱ्या संकटात सापडतात. पोलिस प्रशासन व नगरपालिका प्रशासन कोणत्याच जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत नाही. स्वतःचा बचाव करून कोरोनाग्रस्त व्यक्तीची हेळसांड करण्याचे अमानुष कृत्य घडताना दिसत आहे.
कोविड19 साठी राज्य सरकार अनेक ठिकाणी रुग्णालय व बेडची उपलब्धता करताना दिसत आहे पण त्याच्यात अनेक त्रुटी आहेत. प्रशासन कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. रुग्णालयात खाजगी डॉक्टर अवाजवी फी आकारत नागरिकांना लुटत आहेत. असेच सूरू राहिले तर मृत्यूचा आकडासुध्दा वाढतच राहणार यात शंका नाही.
*अजूनही वेळ गेली नाही. आता आपण आपले रक्षक बनले पाहिजे.नियम व अटी आपल्यासाठी लावून स्वयं कटाक्ष पाळून कोरोनावर विजय मिळवला पाहिजे*
आता आपण आपले रक्षक बना.
स्वतः साठी व परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप गृपवर सार्वजनिक मेसेज पाठवा.*मी कोरोनावर मात करणार*
*यासाठी मी गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ जाणार नाही.* *कामाशिवाय घराबाहेर पडणार नाही. माझ्यासमोर कुणी विनामास्क किंवा नियमाच्या विरोधात जात असेल तर त्याला जाणीव करून देईल.*
*हा संदेश मी प्रत्येकात प्रसारीत करेन.*
*अरुण ठोंबरे*
पत्रकार/संपादक
9322107521


-


अंबरनाथ शहरातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता घरोघरी ताप सर्वेक्षण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून प्रभावी उपायोजना करणे व सक्षम आरोग्याची टीम करावी,
याबाबत अंबरनाथ शिवसेना नगरसेवक माननीय सुभाष साळुंके यांनी निवेदन पत्र द्वारे सूचना वजा विनंती निवेदन उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक–अंबरनाथ नगरपरिषद
मा. जगतसिंग गिरासे साहेब
यांना आज निवेदन पत्र देऊन सविस्तर चर्चा केली, याबाबत त्वरित पावले उचलण्यात येतील असे आश्र्वासन मा. गीरासे साहेब यांनी दिले ……………………………. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र

जनहित न्यूज महाराष्ट्र
एडिटर हरी आल्हाट 9960504729
-







उल्हासनगर कॅम्प नंबर 5 हिल लाईन पोलीस स्टेशन चे पोलीस सब इन्स्पेक्टर मा. हर्षद काळे यांना सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चे अंतरिक्ष सुरक्षा पथक इंटर सर्विस मेडल जाहीर करण्यात आला………………………………………………………………. माननीय हर्षद काळे हे सन 2006 मध्ये पोलीस दलात रुजू झाले……………………………………………………………….. त्यांनी मुंबई पोलिस दलात 6 वर्षे दहशतवाद विरोधी पथकात आपले कर्तव्य बजावले……………………………………………………………. त्यावेळेस 26/ 11 सारखे दहशतवादी हल्ले तसेच रेल्वेचे सिरीयल बम ब्लास्ट. जर्मन बेकरी ब्लास्ट. आणि मालेगाव ब्लास्ट यासारख्या घटना घडत असताना आपले तपास कामाचे कर्तव्य बजावले……………………………………………………………. तसेच नार्को टेस्ट फेक मनी करेन्सी या तपासकामी सुद्धा आपले कर्तव्य बजावले होते…………………………………………………………………. गडचिरोली याठिकाणी पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांची बदली झाली त्यावेळेस गडचिरोली या ठिकाणी चार ते पाच वेळा नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली होती त्या ठिकाणी दोन वेळा सक्सेसफुल इन काउंटर सुद्धा केला त्यावेळेस त्यांना व त्यांचे टीमला एक जिवंत नक्षली पकडण्यास यश मिळाले होते व मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला होता…………………………………………………………………2017 मध्ये ठाणे शहर याठिकाणी त्यांची बदली झाली आणि अडीचशे वर्षापासून ते उल्हासनगरमध्ये कार्यरत आहे………………………………………………………………… ज्या पद्धतीने त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे त्यामुळे त्यांना चार वेळा मेडल मिळाले आहे………………………………………………………………… ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर 
-
100 कारखानदार उद्योजक व्यापारियों ने मिलकर गुरु गुलराज साहिब मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन संस्था का गठन किया,


उल्हासनगर कैम्प नंबर 3, ओ.टी सेक्शन स्थित 100 कारखानदार उद्योजक व्यापारियों ने मिलकर गुरु गुलराज साहिब मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन संस्था का गठन किया,
गुरु गुलराज साहिब मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन के अध्यक्ष पद पर सर्वानुमति से दीपक (टोनी साईं) सीरवानी नियुक्त हुए,
साथ ही चेयरमन के पद पर सुरेश वरन्दानी नियुक्त हुये,
पिंटो बठिजा, गजानंद शेळके, संजय आइलानी, मनीष मेंघवानी, राजेश राजपाल, गिरीश सुखवानी, दिलीप नंदवानी, मनीष कुकरेजा, जितेंद्र माखीजा अन्य आदि कारखानेदारों ने मिलकर गुरु गुलराज साहिब मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन की स्थापना करके उद्योजकों के लिये जनहितकारी संघटन का गठन किया।
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र

जनहित न्यूज महाराष्ट्र
संपादक हरी आल्हाट 9960504729 -

घरकाम करणा-या महिला व सलून व्यावसायिक अडचणीत : आर्थिक मदतीची नितांत गरज
कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले आहे. देशाचीच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली आहे. समाजात असे अनेक घटक आहेत की, ज्यांचा उदरनिर्वाह रोजच्या कमाईवर अवलंबून असतो. त्यात नाका कामगार, हातगाडी,फिरतीवर व्यवसाय करणारे, घरोघरी वर्तमान पेपर टाकणारे, घरकाम करणा-या महिला आदींचा समावेश आहे. लोकांची दाढी, केस कापणारे नाभिक, ब्युटी पार्लर चालक, यांची अवस्था दयनीय झाली आहे. गेले तीन महिने ते बेरोजगार झाले आहेत, त्यामुळे उत्पनाचे साधन नाही आणि खर्च तर सुरूच असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सरकारी वा खाजगी नोकरी करणा-यांना घरबसल्या वेतन मिळत आहे, शेतकरी,निराधार,दारिद्र्य रेषेखालील लोकांना शासनाने अल्प का होईना मदत केली आहे, मात्र घरकाम करणा-या महिला व केशकर्तनालय चालकांना तशी कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांना कोरोना पेक्षा उपासमारीच्या समस्येची जास्त भीती वाटत आहे. त्यामुळे सलून चालक,कारागिर तसेच घरकाम करणा-या महिलांना शासनाने आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.
घरकाम करणा-या महिला या अतिशय गरीब कुटुंबातील असतात. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्या घरोघरी धुणी,भांडी,स्वयंपाक आदी कामं करून आपली उपजीविका करतात.यातील काही महिला विधवा असतात,तर काहींचे पती दारुडे,व्यसनी असतात, किंवा अशिक्षीत असल्याने कुठे रोजगार मिळू शकत नाही अथवा व्यवसाय करण्यासाठी भांडवल नसल्याने त्या घरकाम करीत असतात. त्या महिला असंघटित असल्याने त्यांना मिळेल त्या पगारावर काम करावे लागते.त्यांना मिळणारा पगार अत्यल्प असल्याने पाच-सहा घरी काम केल्यावर त्यांना पाच- सहा हजारापर्यंत वेतन मिळते. यातच त्यांना आपल्या कौटुंबिक गरजा, घरभाडे व मुलांचे शिक्षण, आजारपण हा खर्च भागवावा लागतो.
कोरोनामुळे या महिला कामगारांना सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्या घरमालकांनी कामावर येण्यास बंदी घातली आहे. काही अपवादात्मक मालकांनी या महिलांना एखाद महिना मदत केली असेल परंतू आता तीन महिने झाले, त्या कामावर जाऊ शकत नाहीत. लाॅकडाऊन शिथील झाला असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कामावर रूजू करून घेण्यात आलेले नाही. एकीकडे घरभाडे, लाईट बील सुरू असताना उत्पन्न नसल्याने आधीच गरीबी व समस्यांनी ग्रासलेल्या या महिलांची अवस्था दयनीय झाली आहे. त्या काम करीत असलेल्या सोसायट्यांनी देखील त्यांच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे सर्व परिस्थिती पुर्ववत होईपर्यंत या महिलांनी जगायचे कसे ? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. या महिला सर्व अटी व नियम पाळून कामावर रूजू होण्यास तयार आहेत ? परंतू कोरोनासंसर्गाच्या भीतीमुळे त्यांना बहुतांश लोक कामावर रूजू करून घेत नाहीत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने आपल्या कोविड-19 निधीतून या महिलांना दरमहा ठराविक रक्कम दिली पाहिजे. तरच त्यांची उपासमारी टळेल व जगणे सुसह्य होईल.
अनलाॅक-१ मुळे हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे.पी-१, पी-२ नियमानुसार दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे परंतू त्यात सलून व पार्लरचा समावेश नाही. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सलून चालक व कारागिरांची संख्या लक्षणीय आहे.गेल्या २५ मार्च पासून सलून/ पार्लर पूर्णपणे बंद आहेत.या व्यावसायिकांच्या उपजीविकेचे सलून व ब्युटी पार्लर हेच साधन आहे. त्यात अनेक कारागिर नोकरी करतात. सलून बंद असल्याने सलून चालकाबरोबरच हे कारागिर देखील बेरोजगार झाले आहेत. याच बरोबर ब्युटी पार्लरमधेही महिला कारागिर व संचालिका यांच्यावर अचानक बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. या व्यवसायास स्वयंरोजगार म्हणून पाहिले जाते.त्यात सुशिक्षित पुरूष व महिला स्वयंरोजगारा मार्फत आपली उपजीविका करीत होते. गेली तीन महिने हे सलून व पार्लर बंद असल्याने त्यांची देखील खुपच आर्थिक ओढाताण होत आहे. त्यांच्यावर व्यवसायिक म्हणून शिक्का बसल्याने ते मदतीसाठी हात ही फैलावू शकत नाहीत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
यातील खुपच कमी लोकांची स्वतःच्या मालकीची दुकानं,गाळे आहेत. बहुतांश व्यावसायिक भाड्याच्या दुकानात आपला व्यवसाय करीत आहेत. या दुकानांचे भाडे लोकेशननुसार आठ हजारापासून पंधरा, वीस,पंचवीस हजारापर्यंत असते. अशा व्यावसायिकांचे तीन महिन्याचे भाडे थकित झाले आहे,आणि मालक तर भाड्यासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे त्यांचे दुहेरी मरण झाले आहे. एकीकडे रोजगार नसल्याने खायचे, खर्चाचे वांदे,आणि दुसरीकडे दरमहा थकित भाड्याचा वाढणारा डोंगर, त्यामुळे हजारो कारागिर मेटाकुटीस आले आहेत. सलून, पार्लरमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशक्यच. कारण किमान गि-हाईक व कारागिर यांचा थेट संपर्क येतोच. शिवाय कटिंगसाठी वापरली जाणारी कैची, ब्रश, सेव्हिंग क्रिम, लोशन, टाॅवेल, नॅपकिन यामुळे दोघांनाही संसर्गाचा मोठा धोका संभवतो. त्यामुळे नजीकच्या काळात सलून,पार्लरला परवानगी मिळण्याची शक्यता वाटत नाही .अशा परिस्थितीत या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांनी जायचे कुठे ? आणि गंमत म्हणजे गाव बसा नही और लुटेरे हाजिर, या उक्ती प्रमाणे सलून संघटनांनी दाढी-100 रूपये व केस कर्तन-200 रूपये हा वाढीव दर जाहिरही करून टाकला. त्यामुळे त्यांच्या विषयी सहानुभूती असलेले ग्राहकही नाराज झाले आहेत. याचा परिणाम त्यांच्या समर्थनार्थ कोणी पुढाकार घेत नाही. सलूनच्या दर निश्चितीसाठी अधिकृत शासकीय नियंत्रणेची गरजही या निमित्ताने अधोरेखित होते.अनेक समव्यावसायिकांना हे दर मंजूर नसतात, कारण त्याचा त्यांच्या व्यवसायावर निश्चितच दुष्परिणाम होतो. परंतू संघटनेचा आदेश पाळला नाही तर काय होईल ही भीती भेडसावते. सद्यस्थितीत हे व्यावसायिक प्रचंड तणावाखाली आहेत.घर चालवणे व थकित भाडे कसे भरावे ? या दोन विवंचना त्यांना भेडसावत आहेत. त्यांच्या या बिकट परिस्थितीची तातडीने दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने या व्यावसायिकांना दरमहा प्रमाणे भरघोस किंवा एकरकमी मदत जाहिर करणे,आवश्यक आहे.
.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता
9822902470
-


जनहित न्यूज महाराष्ट्र ………………………………………………. पत्रकाराच्या नजरेतून …
महाराष्ट्रातील राजकारणात अव्वल जाणता राजा शरदचंद्रजी पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आज 21 वर्ष पूर्ण होत आहे. हा पक्ष 10 जून 1999 रोजी स्थापन झाला. या पक्षाचे सर्वेसर्वा व ज्यांच्यामुळे पक्ष भरारी घेत आहे त्यांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. कारण शरदचंद्रजी पवार साहेब हे महान व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे .
राजकारण ,समाजकारण,कृषी ,क्रीडा ,शिक्षण ,क्रिकेट , कुस्ती,अश्या विविधांगी अंगाने त्यांनी उल्लेखनीय व अविरत काम केले. कॉलेज जीवनापासून त्यांनी राजकारणात स्वतः ला झोकून दिले ,त्यांचे कर्तृत्व पाहून स्व.यशवंतराव चव्हाण साहेबानी त्यांना हात दिला , मार्गदर्शन पर धडे दिले. पवार साहेब हे यशवंतरावजीचे मानस पुत्र पण या पुत्राने आपल्या कर्तुत्वाने मानस पित्याचे ही नाव उज्वल केले.पवार साहेबानी समग्र घराण्याला एक आदर्श घालून दिला. काम हाच कामाचा गुरू आहे जीवन कोणाला ही फुकट कधीच देत नाहीत. त्यासाठी मेहनत करावी लागते. जिंकणे याचा अर्थ असा कधीच नसतो की प्रत्येक वेळी तुम्ही विजय मिळवलाच पाहिजे ,पण त्याचा शेवट मात्र तुमच्या विजयात झाला पाहिजे.
पवार घराण्यातील कोणतीही व्यक्ती हि रिकामटेकडी नाही ,उच्चविद्या विभूषित असल्याने अनेक प्रकारच्या बाबी प्रत्येकाने हाताळल्याआहेत . अनेक संस्थाचे जाळे त्यांनी निर्माण केले ज्यात प्रसारमाध्यमे ,कृषी प्रतिष्ठान ,विद्या प्रतिष्ठान ,साखर कारखानदारी , बँकिंग ,व बांधकाम प्रोजेक्ट ,अश्या विविध बाबीचा समावेश आहे ,, त्याचे व्यवस्थापन करणे ,आणि दुसऱ्या बाजूने राजकारण करीत राहणे असे समांतरपणे काम करून पक्षाला मजबूत करण्याची किमया यांनी केली. पवार साहेब यांची काम करण्याची पद्धत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध असते. कोणतेही काम करताना विचारपूर्वक करतात. तोंडाचा कॅन्सर झाल्या नंतरसुध्दा व अन्न पदार्थ गिळता येत नसतानाही ते बेडवर कधीच राहिले नाहीत.किंवा उशिरा कधी उठले नाहीत. वाचण्यात आलेला एक किस्सा असा की,
माजी सहकार मंत्री कै प्रताप सिंह जी मोहिते पाटील साहेब यांच्या पत्नी आदरणीय पद्मजा देवी ज्यांना आम्ही आई साहेब म्हणून आमच्या भागात संबोधले जाते , त्यांनी साहेबाचे बद्दल किस्सा सांगितला होता ,साहेबानी निरोप दिला की मी सकाळी नाश्त्याला तुमच्या कडे येतो ,,फक्त अंडा आम्लेट बनवा ,, सकाळी 7 वाजता साहेब आले ,, आम्लेट चा एक एक तुकडा तोंडात अक्षरशः हाताने ते ढकलत होते , त्या स्किन मधून आलेले रक्त ते एका हाताने पुसत होते ,, साहेब कधी वेदनेवर रडले नाहीत त्यांनी त्यावर मात केली ,बोलताना त्यांचा आवाज स्पष्ट येत नव्हता पण ते अखंड बोलत राहिले आज साहेब काय म्हणतात हे स्पष्ट पणे समजते ,, पायाला जखम असताना सुध्दा हा नेता पूरपरिस्थिती पाहण्यासाठी मैदानात उतरला. निवडणुका चालू असताना थेट उदयनराजे ना अंगावर घेताना ते भर पावसात भिजले. हि एक न विसरणारा अविस्मरणीय ठेवा आहे .साहेब महान नेतृत्वा पैकी एक आहेत.
आज कोणत्याही निवडणुका नसताना 80 वर्षाचा हा अतुलनीय योद्धा कुटुंबकर्त्याच्या भूमिकेतून कोकण दौऱ्यावर शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेत आहेत ,सकाळी 8 30 ते रात्री 10 पर्यंत आढावा घेत रत्नागिरी ,रायगड या भागात 2 दिवसाचा दौरा करणारे साहेब फक्त पश्चिम महाराष्ट्रा पुरतेच आहेत असे म्हणणाऱ्याच्या तोंडात एक चपराक आहे. मराठवाडा भूकंप असो ,की सांगलीचा पूर किंवा गुजरात भूकंप ,अथवा आत्ता आलेले निसर्ग चक्रीवादळ , या संकटाला साहेब भिडतात हेच यातून दिसून आले आहे. जाणता राजा असे लोक का म्हणतात याचे हे उत्तर आहे,त्याचे जाणते राजकारण आहे ,म्हणून लोक म्हणतात साहेब मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त एकदा लढ म्हणा राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारचे ही बळ तुमच्या मागे उभे करू हे आश्वासक शब्द साहेबाचे आहेत,
अशा या महाराष्ट्रातील राजकारणात अव्वल जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांना मानाचा मुजरा.
पत्रकाराच्या नजरेतून मला व माझ्या लेखणीला बळ मिळाले .
जय महाराष्ट्र । जय हिंद ॥
……………………………………………….
अरूण ठोंबरे
पत्रकार /संपादक
9322107521/9527154112
अरुण ठोंबरे
पत्रकार/ संपादक














You must be logged in to post a comment.