लेखक: जनहित न्यूज महाराष्ट्र

  • उल्हासनगर शहर जिल्हाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चा २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आले त्या प्रसंगी भारत राजवाणी (गंगोत्री) प्रदेश चिटणीस गटनेता उ.न.पा माधव बगाडे साहेब नगरसेवक बगाडे ताई सामाजिक न्याय विभागाचे उल्हासनगर अध्यक्ष अनिल बंगाळे युवा नेता विकास खरात उपस्थित होते…….
    ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
  • जनहित न्यूज महाराष्ट्र
    उल्हासनगर के ऑटो रिक्शा चालकों में अर्सेनिक अल्बम 30 होम्योपैथी दवाई की 1000 ख़ुराक विनामूल्य वितरित…
    अर्सेनिक अल्बम 30 होम्योपैथी दवाई की 1000 ख़ुराक उल्हासनगर के 7000 ऑटो रिक्शा चालकों और उनके 28000 परिवार जनों को फायदा होने के जनहितकारी विचार से विनामूल्य वितरित करने वाले उल्हासनगर की
    डॉ साधना गायकर जी द्वारा एक और समाजकार्य सिद्ध हुआ,
    रमाकांत चव्हाण ऑटो रिक्शा युनियन के
    अध्यक्ष रविन्द्रसिंह भुल्लर और पदाधिकारीयों की उपस्थिति में वितरण किया गया,
    कोरोना वायरस संक्रमण के विरुद्ध स्वयम के बचाव के लिये
    रोग निरोधी दवाई के रूप में
    भारत सरकार आयुष मंत्रालय द्वारा मान्यता प्राप्त अर्सेनिकम अल्बम 30 नामक
    होम्योपैथी दवाई की विनामूल्य ख़ुराक देने के लिये उल्हासनगर की डॉ साधना जी गायकर सर्वप्रथम आगे आईं,
    इसके पहले भी उल्हासनगर मनपा आयुक्त,
    पोलिस उपायुक्त परिमंडल 4, उल्हासनगर सहायक पोलिस आयुक्त, हिललाइन पोलिस स्टेशन, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन, उल्हासनगर मनपा कार्यालय के
    कर्मचारियों अधिकारियों और आशा वर्कर ये जो सभी कोरोना योद्धा बनकर लड़ रहे है,
    उनकी सेहत की मंगल कामना करते हुये डॉक्टर साधना गायकर जी द्वारा 1300 पैकेट पिछले महीने
    विनामूल्य वितरित किया गया था।

    . ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
  • YouTube वर “उल्हासनगर पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी 5 दरोडेखोर जेरबंद” पहा

      उल्हासनगर पोलिस ठाण्याची दमदार कामगिरी
      पाच दरोडेखोर हत्यारासह अटक
    ………………………………….उल्हासनगर लक्ष्मी कंपाऊड येथे दरोडा घालण्यसाठी आलेल्या पाच दरोडेखोरांना घातक हत्यारासह अटक करण्यात आली आहे…………………………….पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    …………………………………उल्हासनगर कॅम्प नंबर 1 पोलिस ठाणे च्या. हद्दीतील लक्ष्मी कंपाऊंड येथिल एका कापड कारखान्यात काही दरोडेखोर येत असल्याची  गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.त्यानुसार या परीसरात सापळा रचण्यात आला होता…………………………….मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पाच जण यासापळ्यात अडकले………………………..पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली…………………………….त्यांच्या कडून तलवारी,कोयता आणि मिरचीची पुड जप्त करून त्यांना गजाआड करण्यात आले आहे……………………………..यातील 2 दरोडेखोर हे रेकाँर्डवरील गुन्हेगार आहेत…………………………… अधिक तपास उल्हासनगर कॅम्प नंबर 1 पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी करीत आहेत ……………………………………………………………… प्रतिनिधी कृष्णा महाले जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

  • लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन यांच्या वतीने औरंगाबाद मधील गरजू नागरिकांना धान्य वाटप……………………………………………………………….. सध्या देशात कोरोना सारख्या महामारी चे संकट निर्माण झाले असून देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे………………………………………………………………… टाळेबंदी मुळे नागरिकांचे व्यवहार व कामकाज ठप्प झाले असून त्यांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते याची जाणीव ठेवून औरंगाबाद येथील लोक स्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन चे मावळे यांनी गरजू लोकांना मदतीचा हात दिला……………………………………………………………….. औरंगाबाद मधील लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशनचे मावळे यांनी गरजवंतांना राशन वाटप केल्या बद्दल लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशनचे समस्त वरिष्ठ पदाधिकारी यांनी या मावळ्यांचे कौतुक केले आहे………………………………………………………………… यावेळी मराठवाडा अध्यक्ष मा. हर्षल दाभाडकर. निरंजन पाठक. राहुल जावळे. सार्थक कुलकर्णी. तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते…………………………………………………………………. ब्युरो रिपोर्ट जनहीत न्यूज महाराष्ट्र औरंगाबाद
  • जनहित न्यूज महाराष्ट्र

    उल्हासनगर महानगरपालिका प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व रस्त्यातील खड्डे दुरुस्ती कामे ठेकेदारामार्फत करून घेत असते परंतु या वर्षी देशात कोरोना सारख्या महामारी ने थैमान घातले असून यामुळे महानगरपालिकेचे कामकाज धीम्यागतीने सुरू आहे

    सध्या नाले सफाई चे काम सुरू केले आहे…. परंतु रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केलेले नाही सध्या लॉक डाऊन असल्याने शहरात व रस्त्यावर रहादारी कमी आहे या मुळे या रस्त्याची कामे त्वरित झाली तर पावसाळ्यात खड्ड्या पासून होणारी जीवित हानी वाचू शकते

    उल्हासनगर शहरात अनेक वेळा पावसाळ्यात व पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या खड्ड्यांनी जीवित हानी झालेली आहे

    प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये या करिता पावसाळ्यापूर्वीच रस्त्यातील खड्डे भरणे गरजेचे आहे

    उल्हासनगर महानगर पालिकेने शहरात अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम चालू केलेले आहे. उल्हासनगर पूर्व याठिकाणी सिमेंट काँक्रीट चे काम झालेले आहे तसेच शहाड रेल्वे स्टेशन पासून चोपडा कोर्ट कडे येणारा रस्ताही व्यवस्थित झालेला आहे याबद्दल शंका नाही

    परंतु काही रस्ते वर्दळी चे आहेत त्याच ठिकाणी अपघात घडत असतात आणि त्याला कारण असते फक्त रस्त्याचे खड्डे

    प्रत्येक वर्षी उल्हासनगर शहरात रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी नागरिक रस्त्यावर येऊन अनेक प्रकारचे आंदोलने करताना पाहिले आहेत. गणेशोत्सव मंडळ तसेच नागरिक. रिक्षा चालक मालक युनियन संघटना. तर कधी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनीसुद्धा उल्हासनगर शहरातील रस्त्यांचे खड्डे मागील वर्षी भरून काढल्याचे चित्र दिसले आहे परंतु यावर्षी हे चित्र दिसण्या पूर्वी उल्हासनगर महानगरपालिका संबंधित अधिकारी यांनी रस्त्याच्या खड्ड्यांकडे लक्ष घालावे जेणे करून मागील वर्षाचे चित्र पुन्हा दिसणार नाही

    उल्हासनगर कॅम्प नंबर 3 कल्याण अंबरनाथ रोड वरील अशोक सिनेमा व व फालवर लाईन राधास्वामी सत्संग चौक याठिकाणी रस्ते सुरक्षित असावेत रेड क्रॉस हॉस्पिटल जवळील चौकात. तसेच खेमाणी चौक. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 भाजी मार्केट जवळील मेन रोड. सेक्शन 17 पेट्रोल पंप चौक. शांतीनगर समशान भूमी चौक. डरबी हॉटेल ओल्ड एसबीआय बँक चौक.

    असे अनेक ठिकाणी मेन रोड वर खड्डे दिसत आहेत. तर अनेक वस्त्यांमधील रहदारीची रस्ते खराब झालेल्या अवस्थेत आहे. त्यापैकीच एक उल्हासनगर कॅम्प नंबर 5 उल्हासनगर महानगरपालिका वसाहत वाल्मिकी नगर याठिकाणी 1 वर्षापूर्वी नाल्यावर असलेला लहान पुलाची जमीन ढासळली असून 1 वर्षा पूर्वी प्रभाग समिती 4 बांधकाम विभाग चे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी करून गेले असतानाही त्या पुलाचे काम सुरू झाले नाही.. त्या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी व त्यांचे कुटुंब यांची रहदारी असते

    त्यातच लहान लहान मुलेही त्याच ठिकाणी ये-जा करीत असतात.. सदर या पुलाचे काम आणि शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम कधी सुरू होणार आहे या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

    ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र

  • YouTube वर “उल्हासनगर मध्ये बेशिस्त दुकानदार यांच्यावर म न पा ची कारवाई” पहा

    शहरातील नागरीकांनी सामाजिक भान ठेवावं
    पोलिस आणि मनपा प्रशासनाचं अव्हान!!!

    उल्हासनगरात चार दिवसां पासून सर्व दुकानं,व्यावसायिक वापर सुरू झाला . दुकानदार आणि गि-हाईक बिनधास्तपणे सम /विषम (P 1, P 2)चे उल्लंघन करीत असल्यानं पालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीनं आज दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.खरेदी करतांना नागरीकांनी सामाजिक भान ठेवावं असं अव्हान पोलिस निरीक्षक रमेश भामे आणि पालिका सहा.आयुक्त गणेश शिंपी यांनी केलं आहे.
    नागरीकांची गरज आणि व्यापा-यांची उपासमार लक्षात घेऊन मनपा आयुक्त समिर उन्हाळे यांनी शहर रेड झोन मध्ये असून ही शहरातील
    व्यापा-यांना सम -विषम व सोशल डिस्टन्स नियमा आधिन परवांनगी दिली.मात्र नागरीक (गि-हाईक) आणि दुकानदार नियमांचे पालन करीत नसल्याची तक्रारी मनपा आणि पोलिस प्रशासनाकडं आल्या. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदारांवर आज कारवाई करण्यात आली. यामुळे दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.तर बेशिस्त नागरीकांना धडा मिळाला आहे.

    प्रतिनिधी कृष्णा महाले

  • YouTube वर “उल्हासनगर मध्ये अडकलेले परप्रांतीय मजुरांनी दिल्या जय हिंद जय महाराष्ट्र च्या घोषणा” पहा

    https://youtu.be/X3kuOhik15cजनहित न्यूज महाराष्ट्र………………………………. ……………………………. उल्हासनगर येथील परप्रांतीय यांना कल्याण येथून एका स्पेशल ट्रेन ने झारखंड याठिकाणी पाठवण्यात आले. …………………………… ………………………………. उल्हासनगर येथील ग्लोबल राईट्स फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने उल्हासनगर मध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने उल्हासनगर मधील शिल्लक राहिलेले झारखंड बिहार मधील श्रमिक मजूर यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने दिली होती त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेने व पोलीस प्रशासनाच्या देखरेखी मध्ये सोशल डिस्टन्स चे नियम पाळून त्या मजुरांना कल्याण वरून गिरिडीह झारखंड बिहार या ट्रेनमध्ये पाठवण्यात आले तसेच ग्लोबल राइट्स फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने आपल्या राज्यात जात असलेल्या मजुरांना नाश्ता आणि पाणी वाटप करण्यात आले…………………………… कल्याण वरून आपल्या राज्यात जात असताना त्या श्रमिक मजुरांनी महाराष्ट्र राज्यात त्यांना जे सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केला…………………………… प्रतिनिधी सोनाली बढे जनहित न्यूज महाराष्ट्र……..

  • YouTube वर “शिवसेना नगरसेविका ज्योती माने व शिवनगर शाखा यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन” पहा

    शिवसेना नगरसेविका ज्योती माने आणि शिवनगर शाखा आयोजित आरोग्य शिबिर संपन्न

    उल्हासनगर शहरात करोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता. प्रभाग – १३ च्या शिवसेना नगरसेविका ज्योती श्याम माने आणि शिवनगर लालचक्की शाखेच्या वतीने शिवनगर मधिल नागरीकां साठी  आयोजित भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले.सोशल डिस्टन्सचे पालन करत मोठ्या प्रमाणात नागरीकांनी सहभाग नोंदवला.
     उल्हासनगरात करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे.संक्रमणाची हि साखळी तोडण्यासाठी प्रभाग -१३ च्या शिवसेना नगरसेविका ज्योती श्याम माने आणि शिवसेना शिवनगर शाखेच्या वतीने आज मंगळवारी सार्वजनिक मित्र मंडळाच्या हाँल मध्ये विभागातील नागरीकां साठी आरोग्य विभागाचे आयोजन करण्यात आले होते. डाँ. सुवेधिका सोनावणे, श्रध्दा पाखले  आणि लँब असिस्टेंट सोनू  यांनी नागरीकांची आरोग्य तपासणी करुन औषध वाटप करण्यात आलं.या शिबिराचा विभागातील नागरीकांनी लाभ घेतला.स. ११ ते ०५ वा. पर्यंत शिबिर संपन्न झाले.
    या शिबिराला शाखा प्रमुख राजू शिंदे, विभाग प्रमुख राजू माने, अनिल मराठे.श्याम माने,महिला आघाडीच्या सुनिता तोडकर , सुरेखा मालोदे,अरुणा तोडकर, ज्योती घोलप निशा खरे उप शाखा प्रमुख सुरज सोनकांबळे,राकेश माने सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
    प्रतिनिधी कृष्णा महाले
  • उल्हासनगर मनपा का अजब कारनामा…
    लॉकडाउन पिरियड में इमारत को निष्कासन करने की नोटिस…
    इमारतों के रहिवासी लामबंद हुये, फिर गर्माया धोकादायक इमारतों का मुद्दा…
    उल्हासनगर की धोकादायक इमारतें, जो खाली करवाई या सील की गई सैंकड़ों इमारतों को खुद रिपेयर करे मनपा या फिर इमारतवासीयों को रिपेयरिंग की परमिशन दे, ऐसी मांग हरबार की जाती रही है,
    ज़िंदगी भर मनपा ने इमारतों से टॅक्स लिया है, मनपा का कर्तव्य बनता है कि धोकादायक इमारतवासीयों का पुनर्वसन करे,
    वो करने के अलावा उल्हासनगर मनपा का अजीब ही कारनामा देखने मिला,
    कोरोना महामारी की वजह से केंद्र और राज्य सरकार द्वारा लॉकडाउन पिरियड 31 जुन 2020 तक घोषित है,
    लॉकडाउन पिरियड में 28 मई 2020 के दिन उल्हासनगर की अनेकों धोकादायक इमारतों को नोटिस चिपकायी गयी ये लिखते हुये कि आपकी इमारत को आप स्वयम निष्कासन करें, 7 दिन बाद मनपा निष्कासन करेगी तो उसका खर्च आपसे लिया जाएगा, पहली बात तो अधिकतर इमारतें सील है, उनके रहिवासी कहीं और जगह रहते है उन्हें पता ही कैसे चलेगा कि इमारत में चुपचाप नोटिस चिपकायी गयी है, जैसे तैसे कुछ इमारतवासीयों को पता चला तो चर्चाओं का बाज़ार गर्म हुआ सभी लोगों ने ध्यान देना शुरू किया, उतने में उल्हासनगर मनपा द्वारा कुछ इमारतों को दुसरी नोटिस 3 जुन 2020 को चिपकायी गयी, जिसमे लिखा था कि, आप अपनी इमारत को किसी स्थापत्य अभियंता आर्किटेक्चरल इंजीनियर को दिखाइए और इमारत को खुद ही रिपेयर करवाइये,
    उल्हासनगर मनपा द्वारा लॉकडाउन पिरियड में सब बन्द होने के बावजुद, बरसात के मौसम को देखते हुये अपना पल्ला झाड़ने के इरादे से दी गयी नोटिस को देखते ही इमारतों के रहिवासी लामबंद हुये, कल 8 जुन को उल्हासनगर मनपा आयुक्त से समाजसेविका काजल मुलचंदानी के माध्यम से मुलाकात करके अम्बिकासागर और शिवगंगा अपार्टमेंट के इमारतवासियों ने अपनी व्यथा बताई, और अपनी इमारतों को खुद ही हम रिपेयर करेंगे, हमें परमिशन दी जाये, ऐसी मांग दोहराई गयी।
    लॉकडाउन पिरियड में ऐन बरसात के सामने इमारत को निष्कासन करने की नोटिस मिलने से असमंजस में आये इमारतवासीयों की चिंता के कारण धोकादायक इमारतों का मुद्दा फिर से एक बार गर्माया।

  • अनंत अडचणींवर मात करत शेवटी आई गोदा कॉक्रीटीकरण मुक्त झाली…
    वालधुनी नदी ही नदी पात्रातिल सीमेंटीकरण व कॉन्क्रीटकरण पासुन मुक्त केव्हा होईल…!!!???
    श्री गोदावरी नदी पात्र नमामि गोदा या कार्याचा आरंभ नाशिक स्मार्ट सिटीतील गोदा प्रोजेक्ट अंतर्गत दुतोंडया मारुती पासून सुरू झाला. पहिल्या टप्प्यात, कॉक्रीटीकरण मुक्त गोदेचं काम दुतोंडया मारुती पासून ते गाडगे महाराज पुला पर्यंत येणेप्रमाणे करण्यात येणार आहे. श्री गोदावरी नदी पात्रातील नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या तथा पुराची तीव्रता अधिक करणाऱ्या कुंडातील पायऱ्यारुपी कॉक्रीटची भिंत तसेच १७ प्राचीन कुंडांपैकी पहिल्या टप्प्यात पाच (५) कुंड १) अनामिक कुंड, २) दशाश्वमेघ कुंड ३) रामगया कुंड, ४) पेशवे कुंड आणि ५) खंडोबाच्या कुंडांतील तळातील (रिव्हर बेड) सिमेंट-कॉक्रीट काढून सदर कुंडे पुनर्जीवित करण्यात येणार आहे.
    नाशिककर ७ वर्षांपासून कॉक्रीटीकरण मुक्त गोदेच्या अविरतपणे सुरू असलेल्या लढा तसेच १७ प्राचीन कुंडांचे पुनर्जीवन ह्या आपल्या द्वि लढ्याला यश मिळाले आहे.
    अम्बरनाथ हुन वाहत असलेली वालधुनी नदी च्या पात्रात ही अम्बरनाथ एमआईडीसी येथे सिएट टायर कम्पनी, सैनी कम्पनी, पाले गांव येथे पनवेलकर बिल्डर, अम्बरनाथ शिवमंदिर बाहेर नदी पात्रात कॉन्क्रीट करुन नदी ला पाइप वाटे काढण्यात येणे, असे अनेक असंख्य अनधिकृत निर्माण सहन करत असलेली वालधुनी नदी ही नदी पात्रातिल सीमेंटीकरण व कॉन्क्रीटकरण पासुन मुक्त केव्हा होईल…!!!???
  • पहिले चित्र पहा, वालधुनी नदी चे उगमस्थान येथे आता पाणी कसे स्वच्छ निर्मळ आहे, आणि आपल्या कडे कसे आहे…
    तावली किल्ला,
    मलंगगडचा खंदा पाठीराखा म्हणजे शेजारचा तावली किल्ला,
    तावली किल्ल्यावरुन मलंगगड आणि आजुबाजच्या भुप्रदेशावर नजर ठेवण्यासाठी असलेल्या ह्या टेहळणीसाठीच्या किल्ल्यावरुन उत्तरेकडील कल्याणप्रांत,दुर्गाडी किल्ला,दिंडीगड,माहुली,तसेच पूर्वेकडील चंदेरी, पेब किल्ला(विकटगड),माथेरान,सिद्धगड,असे सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांचे व पर्वत रांगाचे दर्शन होते.
    तावली डोंगराच्या खोऱ्यातुन ऐतिहासिक वालधुनी नदी उगम पावते. ह्याच नदिचा प्रवाह अडवून ब्रिटिशांनी सुमारे १८६० मध्ये GIP Railway (Great Indian Peninsular Railway) ला वाफेच्या ईंजिनसाठी लागणारे पाण्यासाठी माझे काकोळेगाव येथे सुमारे २०० एकरमध्ये विस्तृत धरण बांधले व कोणत्याही विद्युतयंत्रणेशिवाय केवळ गुरुत्वाकर्षण बळाचा वापर करून जलवाहिनीने काकोळे धरणातून कल्याण रेल्वे स्थानकात पाणी पुरवठा केला. देशात पहिली रेल्वे सेवा जेव्हा सुरु झाली तेव्हा ह्याच वालधुनी नदी चे पाणी पुरवले गेले होते, १६० वर्षे जुने हे धरण ईंग्रजांच्या स्थापत्यशास्त्राची साक्ष देत खंबीरपणे उभे आहे.
    तावली डोंगराच्या खोऱ्यातुन वाहणारी वालधुनी नदी अंबरनाथ,उल्हासनगर,विठ्ठलवाडी,कल्याण असा प्रवास करत कल्याणच्या खाडीत जाऊन मिळते.
    हजारो वर्षांपूर्वी ह्या वालधुनीनदी किनारी शिलाहार राजवटीत हेमाडपंथी अम्रेश्वर शिवमंदिर बांधले असुन आज त्याच महादेवाच्या मंदिरामुळे अंबरनाथ शहर ओळखले जाते.मात्र जागतिक वारसा असलेल्या शिवमंदिर वालधुनीनदी प्रदुषणामुळे परिसर दुर्गंधित केलेआहे. ह्यास वाढते औद्योगिकीकरण व झपाट्याने वाढत असलेले नागरिकरण याकडे प्रशासन व राज्यकर्ते सोईस्कर दुर्लक्षकरत आहेत हि शोकांतिका आहे.
  • जनहित न्यूज महाराष्ट्र,………. …. ..
    उल्हासनगर शहरात लॉक डाऊन च्या काळात लोक डाऊन नियमाचे उल्लंघन होऊ नये तसेच उल्हासनगर शहरातील व्यावसायिकांचे दुकाने बंद असल्यामुळे होणारे नुकसान तसेच शहरातील नागरिकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळाव्यात याकरिता उल्हासनगर शहरात व्यावसायिकांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती व त्यांना वेळे पत्रका नुसार अटी व नियम पाळणे बंधनकारक केले होते.. दुकानदार ज्या रोडवर दुकान असेन त्या ठिकाणी 2 पाट्या लावून दिल्या होत्या P 1 आणि P 2 म्हणजे 2 दुकानांच्या मध्य भागी रोड असेन तर एका दिवशी उजवी कडील दुकानदार यानी दुकान उघडावे आणि डावी बाजू कडील दुकानदार यानी दुकान बंद ठेवावे तर दुसऱ्या दिवशी उजवी कडील दुकानदार यानी दुकान बंद ठेवावे तर डावी बाजू कडील दुकानदार यानी दुकान उघडावे असे नियम उल्हासनगर महानगर पालिकेच्या अधिकारी यांनी दिले आहेत…………………………… नियम लागू असताना सुध्दा नियम पाळले जात नाही असे लक्षात येताच उल्हासनगर महानगर पालिका चे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना पुन्हा रस्त्यावर जावून पाहणी करावी लागत आहे…………………………….. उल्हासनगर मध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिनांक 7 जून रोजी 580 झाली आहे तर 8 जून चा अहवाल येणे बाकी आहे . रुग्ण वाढत आहेत खबरदारी घेणे गरजेचे आहे.. कारण आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे… दुकानदारांनी नियमानुसार दुकान उघडावे. दुकाना समोर गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी… नागरिकांनी सुध्दा स्वतःची काळजी घ्यावी कोणत्याही प्रकारची खरेदी साठी दुकानात जाणे गरजेचे असेन तर रांगेत उभे राहावे सोशल distence चे नियम पाळून रांगेत उभे राहावे.. स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित राहीन. कोणत्याही प्रकार चा धोका पत्करू नये. खरेदी करण्यासाठी थोडा वेळ लागला तरी लागू द्या परंतु. सुरक्षित रहावे.. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र.. उल्हासनगर
  • उल्हासनगर महानगरपालिका चे मा. आयुक्त साहेब यांचा आदेशानुसार कॉन्टाईन्टमेन्ट झोन मधील सर्व सध्या स्तितिथ जवळपास 60 टॉयलेटचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी मुंबईचा धर्तीवर 2 Sanitizer Machine आणि zoono surface sanitizer उपलब्ध करून घेतले आहे.
    सदर झुनो सरफेस सानिटीझर ने एकदा निर्जंतुकीकरण केल्यास 30 दिवस त्या जागेवर निर्जंतुकीकरण करावे लागत नाही.
    सदरचे द्रव्य कॉरोना विषाणूवर अत्यंत प्रभावीपणे काम करत असून त्याला फैलाव होण्यास प्रतिबंध करतो.
    आज पासून मा महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्ष नेता यांचा मार्गदर्शना खाली सदरचे काम सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक माननीय एकनाथ पवार साहेब यांनी दिली………………………….. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
  • परीक्षेचेही गलिच्छ राजकारण !
    राजकारण हे जितके चांगले त्याहून जास्त वाईट असते, याचा प्रत्यय वारंवार येत असतो. राजकारणामागे समाजकल्याणाची भावना असावी,अशी आपली अपेक्षा असते.परंतू राजकारण हे एकमेकाविरोधात वापरायचे दुधारी अस्त्र असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. स्वार्थासाठी युती,आघाडी करायची व स्वार्थाआड आली तर तत्व आदर्शांना तिलांजली देत विसंगत विचार आचार असलेल्या शत्रूवत असलेल्या पक्षांशी सोयरिक करायची. महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या लग्न एकाबरोबर व हनिमून दुस-याबरोबर असे झाले आहे. या राजकारण्यांना लाखो परिक्षार्थींच्या जीवनाशी खेळत परीक्षेचे जे राजकारण चालवले आहे, ते लांच्छनास्पद आहे.
    मैत्री असली की दुर्गुणही गुण वाटतात आणि मैत्रीत फूट पडली, ती भंगली की मग प्रत्येक गुणही दोष वाटू लागतो. शिवसेना भाजपातील कलगीतुरा आता याच वळणावर येऊन ठेपला आहे. शिवसेनेने मिळवलेले मुख्यमंत्री पद भाजपाच्या डोळ्यात खुप लागले आहे.भाजपाला व पर्यायाने देवेंद्र फडणविस यांना जळी स्थळी,काष्ठी उद्धव ठाकरे चुकीचे,अपयशी वाटत आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून ‘सहकार्य’ हा शब्दच भाजपाच्या शब्दकोशातून नष्ट झाला आहे. प्रत्येक बाबतीत विरोध विरोध आणि विरोध हा एक कलमी कार्यक्रम हाती घेतल्या प्रमाणे भाजप वागत आहे.
    भाजपा गेले काही महिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामाध्यमातून राजकारण करीत आहे. लोकशाही विकास आघाडी समोर सतत अडचणी निर्माण करणे व त्यावरून उद्धव ठाकरे व लोकशाही विकास आघाडीस टार्गेट करणे हा एक कलमी कार्यक्रम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी राबविला आहे.
    आता पदवी वर्गाच्या परीक्षा घेण्यावरून हेच राजकारण सुरू आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून वर्षभराच्या चाचण्यांच्या सरासरी वरून त्यांना उत्तीर्ण करावे, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण मंत्री उदय सामंत, प्राजक्त तनपुरे, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून तसेच विद्यापिठांच्या कुलगुरुंशी विचार विनिमय करून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
    या निर्णयाच्या दुस-याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायद्यावर बोट ठेवत परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करून आपली नापसंती व्यक्त केली. अर्थात या निर्णयाच्या मागे भाजपाचे असंतुष्ट नेते आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. या निर्णयाचा उद्देश विद्यार्थी हित हाच असता तर काहीच हरकत नव्हती. परंतू याद्वारे पुन्हा राज्यशासनापुढे एक नवे संकट निर्माण करायचे व त्याचे भांडवल करून सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत,राष्ट्रपती राजवट आणण्याचा भाजपाचा डाव आहे.
    इतर देशात जिथे कोरानाच्या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या तेथे कोरोनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात किमान आठ लाख परिक्षार्थी आहेत. लाॅकडाऊनमुळे ते आपल्या गावी वा अन्य शहरात अडकले आहेत. त्यांना परीक्षेसाठी केंद्रावर आणणे व नेणे यामुळे राज्य शासनाच्या यंत्रणेवर अधिक ताण पडणार आहे. परीक्षा कालावधीत त्यांच्या निवासाची, भोजनाची व सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागेल ती वेगळीच. तसेच या परीक्षांसाठी जे शिक्षक, पर्यवेक्षक आवश्यक आहेत,
    त्यांनाही ठिकठिकाणावरून आणून त्यांचीही प्रवास,निवास,भोजन व सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी लागेल. हे सर्व विद्यार्थी व शिक्षक राज्यातील विविध जिल्ह्यातून परीक्षेसाठी येतील. ते रेड झोन मधलेही असू शकतील. त्यातील काही लोकांना जर कोरोनाचा संसर्ग झालेला असेल तर या आठ लाख विद्यार्थी व हजारो शिक्षकांचे आरोग्य धोक्यात येऊन कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसा अनुभव अन्यत्र आलेला आहे.
    विद्यार्थी परीक्षेला आला आणि त्याला ऐन परीक्षेच्या काळातच कोरोना झाला तर त्याचे अन्य पेपर कोण देणार? त्यामुळे अन्य पेपरला अनुपस्थित राहिल्याने तो अनुत्तीर्ण होईल व त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल.हा प्रकार हजारो विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू शकतो.निर्जंतुकीकरण, (सॅनिटायझेशन,) सोशल डिस्टन्सिंग, याचा पार बोजवारा उडून जाईल. आणि दुर्दैवाने नेमके हेच घडले तर मग आपले विरोधी पक्ष नेते महा विकास आघाडी विरोधात आघाडी उघडण्यात आघाडीवर असतील, हे वेगळे सांगायला नको.
    आता राज्यपालांच्या आग्रहामुळे राज्य शासनाने नाईलाजास्तव पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १५ जुलै पासून घेण्याचे ठरवले आहे. या परिक्षांमुळे शासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडणार व कोरोना नियंत्रणाच्या कामात मनुष्यबळ कमी पडणार. शिवाय कोरोनाचा फैलाव होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. अशा पद्धतीने राज्य शासनास कैचीत पकडून अडचणीत आणण्याचा हा नियोजनबद्ध डाव आहे. परीक्षा सुरळीत पार पडल्या तर आम्ही आग्रह केला म्हणून परीक्षा झाल्या, अशी पाठ थोपटून घ्यायला विरोधी पक्ष आघाडी घेणार आणि यामुळे जर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, परीक्षेचा फज्जा उडाला तर राज्य सरकार अपयशी ठरल्याची दवंडी पिटण्यात व राष्ट्रपती राजवटची मागणी रेटून धरण्यास फडणविस फडफड करणार.
    वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, गेल्या काही महिन्यांत राजभवनची प्रतिष्ठा लयास गेली आहे. राजभवनची दादर चौपाटी करून टाकली आहे. उठसूठ राजभवन गाठायचे, लहान सहान कारणांवरून राज्यपालांची भेट घ्यायची, निवेदन दिल्याचा बहाणा करायचा, असेच चालले आहे. आज अमुक अमुक नेते राजभवनवर चहापान करून आले,अशा बातम्या ऐकायला मिळतात. अरे,राजभवनला काय चहाची टपरी समजलात काय ? आणि राज्यपाल महोदय तरी त्याच त्याच लोकांना कसे काय वारंवार भेटीची वेळ देतात, याचे आश्चर्य वाटते. राजकारण इतक्या खालच्या थराला गेल्याचे वाईट वाटते.
    विरोधी पक्षाने राजकारण जरूर करावे, नव्हे तो त्यांचा अधिकारच आहे.परंतू पदवी परीक्षेच्या
    विद्यार्थ्यांची ढाल करून आपण जे गलिच्छ राजकारण करीत आहात ते निश्चितच निषेधाह्यच आहे. आपल्या शूद्र राजकीय स्वार्थासाठी आपण आठ लाख विद्यार्थी, तसेच त्यांचे शिक्षक, पालक व समाजाला कोरोनाच्या विकराल दाढेत ढकलण्यासही मागेपुढे पाहत नाही, आपल्या या गलिच्छ राजकारणाची इतिहास काळ्या अक्षरात अवश्य नोंद घेईल.
    दिलीप मालवणकर
    ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता
    9822902470
  • YouTube वर “शिवसेनेचे मा. दिलीप गायकवाड यांच्या वाढ दिवसा निमित्त राशन वाटप” पहा

    जनहित न्यूज महाराष्ट्र

    आज दिनांक ०६/जून/२०२० रोजी मा. दिलीप गायकवाड यांच्या वाढदिवसा निमीत नगर सेविका ज्योती ताई दिलीप गायकवाड तसेच श्री बाबा रामदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा . बाबूभाई परमार यांच्या माध्यमातून मा. दिलीप गायकवाड यांच्या वाढ दिवसा निमित्त उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथे नागरी आरोग्य सेवा केंद्रात काम करीत असलेल्या कोरोना यौद्धा अशा वर्कर्स ताई ज्या घरोघर जाऊन नागरिकांची तसेच गरोदर माता व बालकांची सेवा करीत आहेत तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र chainel चे संपादक आणि त्यांचे प्रतिनिधी व अँकर टीम या सर्वांना राशन वाटप करण्यात आले या वेळी अशा वर्कर्स ज्या कोरोना महामारी मध्ये जीव धोक्यात घालून काम करीत आहेत परंतु त्यांना त्यांच्या अपेक्षे प्रमाणे मानधन मिळत नाही त्यांना त्यांच्या आपेक्षे प्रमाणे मानधन देण्यात यावा अशी व्यथा आशा वर्कर्स ताई यांनी नगरसेविका ज्योती ताई दिलीप गायकवाड आणि मा. दिलीप गायकवाड यांच्या समोर मांडली असून मा. दिलीप गायकवाड यांनी सुध्दा आशा वर्कर्स यांची मानधनाची मागणी आहे त्या विषय आम्ही लवकरच मा. खासदार साहेब व मुख्यमंत्री साहेब यांना पत्रा द्वारे सूचित करून आशा वर्कर्स यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले या वेळी मा.डाँ.अभीजीत वानखेडे मा. प्रदिप आहिरे मा. बाळा श्रीखंडे, मा. विनोद सालेकर जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक मा. हरी आल्हाट तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते

  • उल्हासनगर शहरात आज दिनांक 5 जून 2020 रोजी 40 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या 482 एवढी झाली आहे. त्या पैकी 206 रुग्ण बरे झाले असून 256 रुग्णांवर उपचार सुरू आहेत…………………………… उल्हासनगर मध्ये काही दुकानदार यांना दुकान उघडण्याची परवानगी मिळाली असली तरी सोशल distence ची जबाबदारी ग्राहक यांची सुध्दा आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी………………………………………………………………. सरकार ने व महानगर पालिका ने पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी उल्हासनगर मध्ये. या सुविधा उपलब्ध करून दिल्या आल्या आहेत. हे नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे………………………………………………………………… आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. आपली थोडीशी चूक कुटुंबातील अनेक लोकांना भोगावी लागत आहे. नागरिकांनी घरा बाहेर जाताना तोंडाला मास्क लावून बाहेर जाणे……………………………. गर्दी च्या ठिकाणी जाणे टाळावे. गरज असेल तेव्हाच बाहेर जावे. आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे.

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें