लेखक: जनहित न्यूज महाराष्ट्र

  • ……………………………………………. गुटखा गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा………………………………………… . 28 मे 2020 रोजी सकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने………………………… ………………. भिवंडी येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स वळगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या गोदामावर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून तेथे हजर असलेल्या सुरज हरीश ठक्कर यांच्या ताब्यातून विविध प्रकारचा गुटखा. पान मसाला. सुगंधित तंबाखू. या महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थाचा रुपये 87.99.822 किंमतीचा साठा जप्त केला आहे……………………………………………….. सदर साठ्याचा मालक इसरार नामक व्यक्ती असल्याचे तसेच त्यास या कामात अब्बास व अर्जुन सेठ हे मदत करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे……………………………………………….. सदर या प्रकरणी आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम व भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्ह्यासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. राजेंद्र शिंगवे. राज्यमंत्री ना. राजेंद्र येड्रावकर व मा आयुक्त अरुण उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त मा. सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणाखाली गुप्तवार्ता विभागातील अधिकाऱ्यांनी यशस्वी रित्या पार पाडली…………. …………………….. अशा प्रकारच्या प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या गोदाम बाबत माहिती अथवा तक्रार असल्यास त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्याचे आवाहन सह आयुक्त मा. सुनील भारद्वाज यांनी जनतेला केली आहे……………………………………………….. ब्युरो रिपोर्ट जनहित महाराष्ट्र. भिवंडी जिल्हा ठाणे
  • पत्रकाराचा आदरयुक्त दबदबा असला पाहिजे !
    पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या स्तंभाकडे पाहताना मी, मदमस्त हत्तीवर अंकुश ठेवणा-या माहुताची उपमा पत्रकारास देतो. मी आजवर पत्रकारांवर व पत्रकारीतेवर लिहिलेले लेख गाजले.या लेखांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी लाभली. प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. मी गेली 40 वर्षे पत्रकारीतेत आहे.त्यामुळे पत्रकारितेतील गुण व अवगुणांची मला माहिती आहे. त्यामुळे मी जे लिहितो ते वस्तुनिष्ठ असते. दरवर्षी 6 जानेवारी रोजी सर्वत्र पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकारांचे व पत्रकारितेचा गुणगौवर केला जातो. पत्रकारांनी देखील या दिवशी स्वतःच्या पत्रकारितेची समीक्षा करणे आवश्यक आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, असे आपण नेहमी म्हणतो. पण या आरश्याचा पारा उडाला तर तो विद्रूप दिसतोच आणि त्यातील प्रतिमा ही विद्रूप दिसतात. समाजाचे व राजकारणाचे खरे, वास्तव रूप दाखवणारा आरसाच खरा असतो. भाटगिरी करून आपल्या व आपल्या पोशिंद्याच्या सोयीचे रूप दाखवणारा आरसा हा पारा उडालेला आरसा असतो. *खिंचो ना कमान,ना तलवार निकालो,जब तोप मुकाबिल है ,तो अखबार निकालो,* अशी वृत्तपत्राची पुर्वी महती होती.आज ती टिकून आहे का ? ज्याला रामशास्त्री बाण्याचे म्हणावे , अशी किती दैनिकं आहेत ?मराठा,केसरी,नवाकाळ,
    बहुजन नायक, या परंपरेतील किती वृत्तपत्रं आज आहेत. पुर्वी पत्रकारीता हे व्रत होते.आता तो व्यवसायच नव्हे तर धंदा झाला आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर तर विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या धनाढ्यांची मालकी आहे. आता पत्रकारितेचा उपयोग भांडवलदार धंदा म्हणून करीत आहेत.
    वृत्तपत्राचं पहिलं पान हे फक्त आणि फक्त वाचकाचे असायला हवे परंतू या पानावर जाहिरातींचे अतिक्रमण झालेले दिसते. एखाद्या वृत्तपत्राचा मथळा, हेडिंग हे त्याचे वैशिष्ट्य असायचे.त्याची दिवसभर चर्चा चालत असे.परंतू आता पहिले पान बिल्डर,विकासकांना, वा उद्योजकांना आंदण दिले जाते. जाहिरातीं शिवाय वृत्तपत्र चालू शकत नाही, हे जरी मान्य असले तरी त्याचे स्थान पहिले पान असूच शकत नाही. मग असे वृत्तपत्र एखाद्या स्मरणिकेसारखे निव्वळ उपन्न मिळविण्याचे साधन ठरते. त्याला वृत्तपत्र म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार नाही.
    आज छपाईचे तंत्रज्ञान झपाट्याने बदलले आहे. पुर्वी 6 वाजताची जी डेडलाईन होती ती रात्री 11 पर्यंत गेली. छायाचित्रासाठी,रंगीत छपाईसाठी किती सायास पडायचे ते त्यावेळच्या पत्रकारांनाच ठाऊक. बातमी पाठवणे देखील किती अवघड काम होते, ते ज्येष्ठ पत्रकार जाणवतात. त्यामुळे जे कष्टसाध्य असते त्यालाच महत्व असते,तसे त्यावेळी पत्रकार व पत्रकारितेस असायचे ?
    आज बातमी ही मॅगीसारखी झटपट तयार होते.एका क्लिक वर बातमी वृत्तपत्रात पोहचते. काॅपीपेस्ट म्हणजे झेराॅक्स बातम्या अनेक वृत्तपत्रात येतात. छायाचित्रांचा तर पाऊस पाडता येतो. पुर्वीच्या पेजमेकिंगसाठी फिलर लागायचे.आता ते काम छायाचित्रं करतात. छायाचित्र लहान मोठे केले,फाऊंट साईज वाढवली किंवा स्पेस वाढवले की झाले पेज तयार. वरून पिझ्झा बर्गरची टेस्ट आणल्याचे समाधान.
    एकंदरीत पत्रकारितेचा धंदा झाला आहे. पत्रकार हा बहुदा हायर केलेला असतो.बातमी पाठव,पण मानधन मागू नको.जाहिराती आणशील त्यात जे कमिशन मिळेल तिच तुझी कमाई, असे धोरण अनेक वृत्तपत्रांचे आहे.त्यामुळे गैरप्रकारांना मोकळे रान करून दिले जाते. काही अपवाद सोडले तर बहुतांश वृत्तपत्रं तुटपुंजे मानधन पत्रकारांना देतात.पूर्ण वेळ पत्रकार सोडले तर जिल्हा,तालुका व शहर पातळीवरील पत्रकारांचे मानधन (?) वेठबिगारालाही लाजविणारे असते.अशा वेळी त्याने प्रामाणिकपणे पत्रकारीता करण्याची अपेक्षा ते दैनिक करू शकत नाही. सर्वसामान्य जनता व वाचकांत पत्रकारांविषयी असलेली क्रेझ व आदरभाव नष्ट होण्यामागचे हेच प्रमुख कारण आहे.वृत्तपत्र स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारेच त्यास मारक ठरतात.
    पूर्ण वेळ व पे रोलवरील प्रकारांव्यतिरिक्त जे पत्रकार आहेत,त्यांना स्ट्रिंजर असे संबोधले जाते.माझ्या मते त्यांनी आत्मनिर्भर व्हावे व स्वतःच्या उपजिविकेसाठी नोकरी,व्यवसाय करूनच पत्रकारीता करावी,तरच त्यांना सन्मान प्राप्त होईल. आज पाकिट पत्रकारीता फोफावली आहे, पेड न्यूज ही वहिवाट झाली आहे.अशा परिस्थितीत पत्रकाराला आपल्या आत्मसन्मानासाठी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रवाहपतीत होण्याऐवजी प्रवाहाविरूध्द पोहण्याची गरज आहे. पत्रकारांबद्धल आदरयुक्त भीती असली पाहिजे, भ्रष्ट ठेकेदार,राजकारणी यांच्यावर दहशत असली पाहिजे. पत्रकारीता ही समाज हित,समाजात परिवर्तन व प्रबोधन करणारी असली पाहिजे. पत्रकाराला प्राईज टॅग लागायला नको.पत्रकाराची किंमत पाकिटातील रकमेवर ठरायला नको.पत्रकार हा आपला गुलाम आहे, वेठबिगार आहे,पे रोलवरील पोस्टमन आहे,अशी भावना निर्माण होणे हे पत्रकारांचे अवमूल्यन व पत्रकारितेची हत्या ठरेल. पैसे कमावण्याची अनेक साधनं आहेत,त्यात याहूनही कित्येक पटीने अधिक पैसे मिळतील. म्हणून पत्रकारांना कळकळीची विनंती,पत्रकारीता कलंकित करू नका,आपल्या पत्रकारितेचा दरारा निर्माण करा, पत्रकार हा सर्वसामान्यांना आधार स्तंभ वाटला पाहिजे व दुष्ट, भ्रष्टांना व अपप्रवृत्तींना कर्दनकाळ वाटला पाहिजे.
    दिलीप मालवणकर
    ज्येष्ठ पत्रकार
    9822902470
  • उल्हासनगर महानगर पालिका प्रभाग समिती 4 च्या हद्दी मधील कॅम्प नंबर 5 भाटिया चौक कुर्ला कॅम्प रोड येथे असलेले मोठे जुनाट झाड आज दिनांक 18 मे 2020 रोजी पडले
    लॉक डाऊन असल्या मुळे
    रस्त्यावर ये जा करीत असलेल्या
    वाहनांची वर्दळ कमी होती
    या मुळे मोठी दुर्घटना टळली.
    सुदैवाने पडलेल्या झाडा मुळे
    कोणालाही दुखापत झाली नाही………. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
  • मुरबाड तालुक्यात अवकाळी पावसाने गरीब आदिवासी नागरिकांचे नुकसान

  • उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. भारत राजवानी (गंगोत्री) यांच्या वतीने आज पासून गरजू लोकांना जेवण वाटप करण्यात येत असुन सरकारी नियम पाळून व कुठे ही गर्दी न करता गरजू लोकांना जेवण वाटप करण्यात येणार आहे.. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
  • कोरोना व्हायरस संसर्गामुळे पुर्ण जग हादरले असुन सरकारणे नाविलाजास्तव जनतेला घरामध्ये अक्षरश:कोंडून ठेवले आहे.सर्व धर्माची दैवत बंदीस्त आहेत,परंतू देवदूत बनून सफेत कपड्यामधील आरोग्य विभागाचे डाॅक्टर्स ,व संबधीत कर्मचारी,शासकीय कर्मचारी,पोलिस सुरक्षा रक्षक आपल्या कुटूंबियांचा विचार न करता घराच्या बाहेर पडून इमानदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत.याचाच भाग मध्यवर्ती रूगणालय उल्हासनगरचे सुरक्षा कर्मचारी गेले सहा महीने अस्थापणेने पगार न देता सुध्दा अत्याअवश्यक सेवा या नियमावलीचे पालन करत आपले कर्तव्य बजावत आहे.अस्थापणा फक्त कागदी घोडे नाचवत आहे,परंतू सप्टेबर २०१९ पासून अद्याप सदर सुरक्षा कर्मचार्याना पगार नसुन सुध्दा या महामारी आजारातसुध्दा आपले आद्य कर्तव्य बजावत आहेत….

    प्रतिनिधी नारायण वाघ उल्हासनगर

  • कोरोना संशयित रुग्ण विलगीकरणा कामी उमनपा साठी 750 रूम ची व्यवस्था… उल्हासनगरात क़ोरोना ची साथ पसरू नयें म्हणुन क़ोरोना चा प्रादुर्भाव रोखण्या साठी केमिकल चीं हवेत फ़वारनी चें मशीन उपलब्ध करुण दिली, त्याचा आज गोलमैदान पासून सुरवात महापौर लीलाबाई आशान यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उल्हासनगर मधील कोरोनाग्रस्त (संशयीत) असलेल्या रुग्ण सोईकरीता भिवंडी बायपास ठाणे रोड वरील टाटा आमंत्रा इमारत येथे विलिगीकरण रुम ची पहाणी सुद्धा आज मा. महापौर लीलाबाई आशान, सभागृह नेते राजेंद्र चौधरी, उप शहर प्रमुख नगरसेवक अरुण आशान, महानगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यान सोबत तिथली पहाणी केली. जवळ जवळ 750 रुम 5 मजली इमारत तिथे आपल्याला उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. अशी तयारी महाराट्र शासनातर्फे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार उल्हासनगर मनपा, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, तसेच भिवंडी मनपा यांच्याकरीता वेगवेगळ्या बिल्डींगमधे रुग्णना विलिगीकरण करण्या करिता रुम उपलब्ध करुन दिले आहेत, त्या 750 रूम मध्ये विज, पाणी, पंखे लाइट व बेड ची सुविधा उल्हासनगर महानगर पालिका तर्फे करण्यात आली, त्यांची पाहणी महापौर यांनी आज केली. आज मितीस उल्हासनगर क़ोरोना मुक्त आहें तरी जनतेने घरी राहुन च सहकार्य करावे अशी विनती महापौर महोदया श्रीमती लीलाताई आशान यानी शहरवासियां ना केली.
  • कोरोनासाठी राष्ट्र कल्याण पार्टीचे रक्तदान शिबीर…
    कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी पातळीवर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. यातच संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी प्रत्येक भागात रक्तदान करण्याचे आव्हान महाराष्ट्र सरकारने केले होते. कोरोना हरेल, महाराष्ट्र जिंकेले हे ब्रीद डोळ्या समोर ठेवत सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण पूर्वेत राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर आणि स्काय रिचर्र क्लासेसचे ओम सर, प्रविन के.सी. यांच्यावतीने आज गुरुवारी दिनांक २६/०३/२०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरा मध्ये नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद देत रक्तदान केले. यावेळी राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. तर या शिबीरासाठी हर्षल साळवी, रूपेश पांचाल, राहुल गुप्ता, राम पांडे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी संकल्प ब्लड बँक, कोळसेवाडी पोलीस स्टेशन व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी देखील विशेष सहकार्य केले.
  • ⭕ब्रेकिंग, मुंबई – नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवणार
    –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि 26: सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
    आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली..
    लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे , त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव दराने वस्तू विकल्यास कारवाई होणार. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले.
  • सर्वांना नम्र विनंती –
    कृपया कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे आता सर्व रेस्टॉरंट्स / ढाबा / फूड कार्ट्स बंद असल्याने रस्त्यावर कुत्री / गायी आणि इतर भटक्या प्राण्यांसाठी दररोज दोन अतिरिक्त चपाती / रोटी आणि इतर भटक्या प्राण्यांना बनवा. हॉटेल / ढाबा कर्मचार्‍यांनी पुरविलेल्या उरलेल्या अन्नावर बहुतेक भटक्या प्राणी टिकून आहेत. दीर्घकाळ लॉकडाऊन झाल्यास हे प्राणी उपासमारीने मरतील. आपण या ब्रेड आपल्या सोसायटी / अपार्टमेंटच्या कर्मचार्‍यांना जनावरांसाठी बाहेर ठेवण्यासाठी देऊ शकता. आपल्या मंडळामधील सर्व लोकांना संदेश द्या.
    चला सर्वांनी प्रयत्न करून पहा …. आणि हा संदेश सामायिक करा. अधिक आणि अधिक लोक चांगले काम करू शकतात आणि जतन करू शकतात …
    धन्य रहा
    जय हिंद
  • पुणे व भिवंडी शहरातून आलेल्या दोन कुटुंबानी आपल्याजवळ बॅगेमध्ये असलेले मंगळसूत्र व मोबाईल हे चुकून रिक्षात विसरले. ते मिळवून देण्यासाठी जनक्रांती संघटना व मा.हेमंत मेरवाडे यांच्या प्रयत्नांसोबत अंबरनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा.श्री जमदाडे साहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत एका दिवसात त्यांचे गहाळ झालेले मंगळसुत्र व मोबाईल मिळवून दिल्याबद्दल त्यांचे जनक्रांती संघटनेतर्फे शतशः आभार. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे गौरवास्पद सम्मान करण्यात आले त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. मनजीतसिंग बग्गा साहेबांनी व शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेदेखील मनपूर्वक आभार
    क्राइम रिपोर्टर संतोष क्षेत्रे
  • वालधुनी नदी स्वच्छता अभियान की शुरुआत हुयी… उल्हासनगर से बहने वाली अत्यंत प्रदूषित वालधुनी नदी का स्वच्छता अभियान आज 18 मार्च को अशोकनगर, उल्हासनगर कैम्प 3 वालधुनी वडोलगांव पुल से शुरू हुआ है,
    उल्हासनगर मनपा के वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक श्री विनोद केणे जी तथा श्री एकनाथ पवार जी द्वारा उक्त अभियान की शुरुआत आज से की गई।
    गत 3.5 वर्षों में उमनपा द्वारा वालधुनी नदी स्वच्छता अभियान पर विशेष ध्यान दिया जा रहा है, जिस कारण आगामी बरसात में बाढ़ के समय घरों में पानी घुसने का प्रमाण काफी कम हो गया है,
    नदी में से केमिकल और सिवेज की बदबू का प्रमाण भी कम हो जाता है,
    साथ ही, वालधुनी और उल्हास नदी में जा मिलने वाले शहर के अन्य नालों की सफाई भी पिछले महीने से शुरू हुई है,
    वालधुनी नदी स्वछता अभियान के लिये उमनपा प्रशासन को हार्दिक धन्यवाद करते हैं…
    वालधुनी उल्हास नदी बिरादरी🙏🏻
    Reporte.Shashikant dayama
    उल्हासनगर
  • कोरोना वाईरस मुळे पोलीस ठाण्यात सैनेटर व डेटॉल वाटप करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मंजितसिंग बग्गा शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ पूर्व
    क्राईम रिपोर्टर संतोष क्षेत्रे जनहित न्यूज महाराष्ट्र

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें