Welcome to My New बातमी Blog
-
विशेष रुप से प्रदर्शित
उल्हासनगर को कचरामुक्त बनाने के एक और कार्य मे जुटी महिला पर्यावरण प्रेमी…उल्हासनगर शहर के एक कर्तव्यनिष्ठ सामाजिक कार्यकर्ता, पर्यावरण प्रेमी, स्वच्छता सर्वेक्षण 2018 में वार्ड प्रतियोगिता अभियान में पहली महिला स्वच्छता निरीक्षक, जिन्होंने अपनी रहिवासित इमारत विकास टावर को कचरामुक्त बनाकर प्रथम पुरस्कार जीता और शून्य कचरा सोसायटी का निर्माण किया, स्वच्छ भारत अभियान में सरकार के निर्णय के अनुसार प्लास्टिक प्रतिबंध अभियान में कुल 300 बेरोजगार महिलाओं को कागज और कपड़े के थैले का निर्माण कर रोज़गार और पर्यावरण रक्षण किया, वृक्ष फाउंडेशन की श्रीमती ज्योती तायडे ने अब उल्हासनगर और आसपास के क्षेत्रों को कचरा मुक्त बनाने का संकल्प लिया है।शुरुआत के तौर पर उन्होंने उल्हासनगर कैंप 1 शहद स्टेशन के सामने कोणार्क रेसीडेंसी आवासीय परिसर में 10 महिलाओं को रोजगार प्रदान किया, गीला कचरा, सूखा कचरा और मेडिकल वेस्ट को अलग करना और उससे खाद उर्वरकों का उत्पादन करना, झाड़ियों और बगीचों की सूखी पत्तियों को इकट्ठा करना, पत्तियों का संग्रह करना और उनसे खाद उर्वरकों का उत्पादन करना, प्लास्टिक बैग, थर्माकोल, बोतलें, कागज को अलग करके उन्हें रीसाइक्लिंग करना, उक्त कार्य मे सोसायटी चेयरमैन डॉ नागपाल, पर्यावरण प्रेमी रेखा ठाकुर जी व उल्हासनगर मनपा के सहयोग से श्रीमती ज्योती तायडे छह माह से कार्य कर रही है, शुरू हुए कार्य की प्रगति के अनुसार आगामी माह में उल्हासनगर की पहली सोसायटी कोणार्क रेसीडेंसी होगी जो कचरा मुक्त जीरो गार्बेज सोसायटी बनेगी, उसका निस्तारण सोसायटी परिसर में ही किया जाएगा और कूड़ा उल्हासनगर मनपा के डंपिंग ग्राउंड में नहीं जाएगा।
-
विशेष रुप से प्रदर्शित
My First Blog Post
Be yourself; Everyone else is already taken. — Oscar Wilde. This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.
-
मुंबईत शिवाजी पार्कमध्ये पण मराठी माणूस उरला नाही; पुरस्कार सोहळ्यातून महेश मांजरेकरांची खंत. मुंबईत मराठी रंगभूमीचा मानाचा समजला जाणारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुलुंड शाखेच्यावतीने 11 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई: ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी होत असून अमराठी किंवा परप्रांतीयांची संख्या वाढत असल्याची चर्चा सातत्याने होत असते. राजकीय वर्तुळातचही यावरुन नेहमीच वाद-विवाद आणि मंथन होते. त्यातच, गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील शाळांमध्ये त्रि-सुत्रीय भाषा धोरण अवलंबण्यावरुन चांगलाच राजकीय वाद निर्माण झाला होता. मनसे आणि शिवसेनेनं मराठीचा मुद्दा उपस्थित करत या धोरणास विरोधही दर्शवला. तर, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठीचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याची टीका सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांनी केली. आता, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा मुंबईतील मराठी माणसांचा टक्का कमी होत असल्याबद्दल मनातील खंत व्यक्त केली.मुंबईत मराठी रंगभूमीचा मानाचा समजला जाणारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुलुंड शाखेच्यावतीने 11 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना “कमल शेडगे ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच, ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि अभिनेत्री अंजली वकसंगकर यांनाही “कमल शेडगे रंगकर्मी पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी बोलताना अभिनेता महेश मांजरेकर यांनी मुंबईतील मराठी माणसांचा टक्का कमी झाल्याची खंत व्यक्त केली.मुंबईमध्ये मराठी पण कमी होत आहे, जे थोडं फार टिकलं आहे ते पुणे आणि मुलुंडमध्ये आहे. आता, शिवाजी पार्कमध्ये पण मराठी माणूस उरला नाही, असे म्हणत अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुंबईतील मराठा टक्का कमी झाल्याने चिंता व्यक्त केली आहे. महेश मांजरेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत. मात्र, शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना-मनसे, राज आणि उद्धव ठाकरेंच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसैनिकांचा आणि मनसैनिकांचं हक्काचं ठिकाण आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यासमोर आहे. मात्र, आता शिवाजी पार्क परिसरातही मराठी माणूस उरला नाही, अशा शब्दात महेश मांजरेकर यांनी खंत व्यक्त केल्याने हा गंभीर विषय असल्याचे लक्षात येईल.मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावर बनवलेला सिनेमामहेश मांजरेकर हे नेहमीच मराठीसाठी आग्रही असतात, मराठी कलाकारांना चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून ते प्रयत्नशील असतात. तसेच, मराठी सिनेमांचे दिग्दर्शन आणि मराठीच्या मुद्द्यावरही ते सिनेमे बनवतात. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… हा मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावर आधारित त्यांचा चित्रपट प्रचंड गाजलाही होता. आता, पुन्हा एकदा त्यांनी मराठीजनांच्या मुंबईतील कमी होत चाललेल्या लोकसंख्येवर भाष्य केलंय.
-
*समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प – माजी आमदार नरेंद्र पवार**पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन. डोंबिवली दि.12 सप्टेंबर प्रतिनिधी कल्याणी आगटे:समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहचवण्याचा भाजपचा हा प्रामाणिक प्रयत्न असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित येणारे सेवा पंधरवडा अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यात यावे असे आवाहन कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभियानाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत कल्याण जिल्हा भाजपची कार्यशाळा संपन्न झाली. त्यामध्ये उपस्थित भाजप पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधताना पवार यांनी हे आवाहन केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती म्हणजेच २ ऑक्टोबर दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवडा २०२५ साजरा करण्यात येणार आहे. या सेवा पंधरवड्यात विविध लोककल्याणकारी उपक्रम आयोजित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे नुकतीच कल्याण जिल्हा कार्यशाळा संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या अभियानाअंतर्गत रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, दिव्यांग व्यक्ती सन्मान आणि उपकरण वितरण, “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण, भूतपूर्व कार्यकर्त्यांचा सन्मान, कार्यकर्त्यांच्या घरी भोजन, “वोकल फॉर लोकल” उपक्रम, स्थानिक मेळावे आणि “मोदी विकास मॅरेथॉन” अशा विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तर आपण सर्वांनी या अभियानात सक्रियपणे सहभागी होऊन समाजसेवेची ही चळवळ अधिक व्यापक करण्याची अपेक्षा व्यक्त करत हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही पवार यांनी केले.या कार्यशाळेस भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब, अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे तसेच कल्याण जिल्हामधील सर्व मंडल अध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यशाळेत सेवा पंधरवड्याच्या काळात राबविण्यात येणारे उपक्रम तसेच वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे या विविध लोककल्याणकारी उपक्रमांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
Follow My Blog
Get new content delivered directly to your inbox.
