
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची मुख्य सचिव श्री.संजीव कुमार यांच्याकडे लेखी मागणी

उल्हासनगर -५ मधिल गायकवाड पाडा, सेक्शन ३६ जवळ असलेल्या अनधिकृत कचरा डेपोमुळे पसरणाऱ्या दुर्गंधीतुन स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने हा अनधिकृत कचरा डेपो तातडीने हटवुन महानगरपालिकेस घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेने प्रास्तवित उसाटने येथील जागा विनाशुल्क हस्तांतरीत करण्याची लेखी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री. संजीव कुमार यांच्याकडे केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी कॅबिनेट बैठकीत हा विषय मांडून महानगरपालिकेने प्रास्तवित केलेली जागा विनाशुल्क हस्तांतरीत करण्याचे मंजूर करण्याबाबतचे आश्वासन दिले.
जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पणी करे