

वालधुनी नदी ही नदी पात्रातिल सीमेंटीकरण व कॉन्क्रीटकरण पासुन मुक्त केव्हा होईल…!!!???
श्री गोदावरी नदी पात्र नमामि गोदा या कार्याचा आरंभ नाशिक स्मार्ट सिटीतील गोदा प्रोजेक्ट अंतर्गत दुतोंडया मारुती पासून सुरू झाला. पहिल्या टप्प्यात, कॉक्रीटीकरण मुक्त गोदेचं काम दुतोंडया मारुती पासून ते गाडगे महाराज पुला पर्यंत येणेप्रमाणे करण्यात येणार आहे. श्री गोदावरी नदी पात्रातील नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या तथा पुराची तीव्रता अधिक करणाऱ्या कुंडातील पायऱ्यारुपी कॉक्रीटची भिंत तसेच १७ प्राचीन कुंडांपैकी पहिल्या टप्प्यात पाच (५) कुंड १) अनामिक कुंड, २) दशाश्वमेघ कुंड ३) रामगया कुंड, ४) पेशवे कुंड आणि ५) खंडोबाच्या कुंडांतील तळातील (रिव्हर बेड) सिमेंट-कॉक्रीट काढून सदर कुंडे पुनर्जीवित करण्यात येणार आहे.
नाशिककर ७ वर्षांपासून कॉक्रीटीकरण मुक्त गोदेच्या अविरतपणे सुरू असलेल्या लढा तसेच १७ प्राचीन कुंडांचे पुनर्जीवन ह्या आपल्या द्वि लढ्याला यश मिळाले आहे.
अम्बरनाथ हुन वाहत असलेली वालधुनी नदी च्या पात्रात ही अम्बरनाथ एमआईडीसी येथे सिएट टायर कम्पनी, सैनी कम्पनी, पाले गांव येथे पनवेलकर बिल्डर, अम्बरनाथ शिवमंदिर बाहेर नदी पात्रात कॉन्क्रीट करुन नदी ला पाइप वाटे काढण्यात येणे, असे अनेक असंख्य अनधिकृत निर्माण सहन करत असलेली वालधुनी नदी ही नदी पात्रातिल सीमेंटीकरण व कॉन्क्रीटकरण पासुन मुक्त केव्हा होईल…!!!???




टिप्पणी करे