पहिले चित्र पहा, वालधुनी नदी चे उगमस्थान येथे आता पाणी कसे स्वच्छ निर्मळ आहे, आणि आपल्या कडे कसे आहे…
तावली किल्ला,
मलंगगडचा खंदा पाठीराखा म्हणजे शेजारचा तावली किल्ला,
तावली किल्ल्यावरुन मलंगगड आणि आजुबाजच्या भुप्रदेशावर नजर ठेवण्यासाठी असलेल्या ह्या टेहळणीसाठीच्या किल्ल्यावरुन उत्तरेकडील कल्याणप्रांत,दुर्गाडी किल्ला,दिंडीगड,माहुली,तसेच पूर्वेकडील चंदेरी, पेब किल्ला(विकटगड),माथेरान,सिद्धगड,असे सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांचे व पर्वत रांगाचे दर्शन होते.
तावली डोंगराच्या खोऱ्यातुन ऐतिहासिक वालधुनी नदी उगम पावते. ह्याच नदिचा प्रवाह अडवून ब्रिटिशांनी सुमारे १८६० मध्ये GIP Railway (Great Indian Peninsular Railway) ला वाफेच्या ईंजिनसाठी लागणारे पाण्यासाठी माझे काकोळेगाव येथे सुमारे २०० एकरमध्ये विस्तृत धरण बांधले व कोणत्याही विद्युतयंत्रणेशिवाय केवळ गुरुत्वाकर्षण बळाचा वापर करून जलवाहिनीने काकोळे धरणातून कल्याण रेल्वे स्थानकात पाणी पुरवठा केला. देशात पहिली रेल्वे सेवा जेव्हा सुरु झाली तेव्हा ह्याच वालधुनी नदी चे पाणी पुरवले गेले होते, १६० वर्षे जुने हे धरण ईंग्रजांच्या स्थापत्यशास्त्राची साक्ष देत खंबीरपणे उभे आहे.
तावली डोंगराच्या खोऱ्यातुन वाहणारी वालधुनी नदी अंबरनाथ,उल्हासनगर,विठ्ठलवाडी,कल्याण असा प्रवास करत कल्याणच्या खाडीत जाऊन मिळते.
हजारो वर्षांपूर्वी ह्या वालधुनीनदी किनारी शिलाहार राजवटीत हेमाडपंथी अम्रेश्वर शिवमंदिर बांधले असुन आज त्याच महादेवाच्या मंदिरामुळे अंबरनाथ शहर ओळखले जाते.मात्र जागतिक वारसा असलेल्या शिवमंदिर वालधुनीनदी प्रदुषणामुळे परिसर दुर्गंधित केलेआहे. ह्यास वाढते औद्योगिकीकरण व झपाट्याने वाढत असलेले नागरिकरण याकडे प्रशासन व राज्यकर्ते सोईस्कर दुर्लक्षकरत आहेत हि शोकांतिका आहे.

टिप्पणी करे

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें