


3 मे 2020
उल्हासनगर – उल्हासनगरातील कोरोना रुग्णांची संख्या 427 पर्यंत पोहचली असून 3 जून रोजी 15 नवे रुग्ण सापडले तर 171 रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार करून घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण 17 रुग्ण दगावले असून 239 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर महानगर पालिका क्षेत्रात 3 जून रोजी 15 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून उल्हासनगर शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 427 पर्यंत पोहचली आहे. 239 रुग्ण उपचार घेत असून लक्षण नसलेले 185, सौम्य लक्षण असलेले 31, ऑक्सीझनवर 6 रुग्ण आहेत. आय सी यू मध्ये 17 रुग्णावर उपचार सुरू आहेत. या कोरोनाच्या रुग्णांपैकी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 171 रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनालकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
बदलापूर येथील 7 आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील 2 रुग्णांवर, मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील 2 अशा प्रकारे 11 रुग्णांवर उल्हासनगर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच कोविड रुग्णालयातून आणि राज्य विमा कामगार योजना रुग्णालयातून 3 जून रोजी 19 कोरोना मुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले. 3 जून रोजी एका कोरोना बाधित झालेल्या रुग्णाचा मृत्यूचा आकडा आता 17 पर्यंत पोहचला आहे.
कोविड रुग्णालय येथे 59, रुग्ण, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय येथे 57 रुग्ण, टेउरम कोरोना केअर सेंटर येथे 8 रुग्ण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे 85 रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी 30 रुग्ण उपचार घेत आहेत. उल्हासनगर कोविड रुग्णालयात ठाणे महापालिका क्षेत्रातील 2, मुंबई महापालिका क्षेत्रातील 2 रुग्ण आणि बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील 7 रुग्ण उपचार घेत आहेत. उल्हासनगर कोविड रुग्णालय येथे 59, राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात 57 रुग्ण, ठाणे येथे 4 रुग्ण, कल्याण डोंबिवली येथे 3 रुग्ण, भिवंडी निजामपूर येथे 1 रुग्ण, मुंबई येथे कामा रुग्णालयात 3 रुग्ण व वाशी येथील रिलायन्स रुग्णालयात 8 आणि कोरोकेअर सेंटर सेंट्रल पार्क येथे 10 रुग्णांवर उपचार सुरू असून 171 रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले असल्याचे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले.
अशा प्रकारे एकूण 15 कोरोना बाधित झालेले रुग्ण मिळून आले तर आज 19 कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुहास मोहनाळकर यांनी दिली.
3 जून रोजी 14 कोरोना बाधित झालेले रुग्ण आढळले आहेत. यात कॅम्प नंबर 2 येथील ओटी सेक्शन परिसरात 2 रुग्ण आढळले तर रमाबाई आंबेडकर नगर येथे 3 रुग्ण, कॅम्प नंबर 2 मधील प्रिया अपार्टमेंट मध्ये 1 रुग्ण, कॅम्प नंबर 5 मध्ये राजीव गांधी नगर येथे 2, सी ब्लॉक रोड येथे 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे, शिवनेरी हॉस्पिटल येथे 1 रुग्ण, शाखा संतोष नगर येथे 1 रुग्ण, कॅम्प नंबर 3 दत्त मंदिर येथे एक रुग्ण, कॅम्प नंबर 3 येथील एक आणि कॅम्प नंबर 4 येथील एक असे दोन कोरोना बाधित झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुहास मोहनाळकर यांनी दिली.


टिप्पणी करे