
कल्याण लोकसभा मतदार संघाचे लाडके खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या निवडीला आज १ वर्ष पूर्ण झाले, याबद्दल खासदारांचे अभिनंदन करण्यात आले!
सर्वत्र कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असूनही सफाई कामगार व घंटा गाडी कर्मचारी यांनी अंबरनाथ स्वच्छ व कचरामुक्त करण्यासाठी कोरोना योद्धा म्हणूनच कार्यरत आहेत. सुभाष साळुंके नेहमी कामगारांना मदत व सहकार्य करीत असतात,
आज पुन्हा एकदा डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या खासदार पदाच्या एक वर्ष पूर्ती निमित विभागातील वॉर्ड ४४ व ४५ मधील अं.न. प चे सफाई कामगार, घंटागाडी चालक,मुकादम, फवारणी कामगार यांना फूड पॉकेट, तसेच संसर्ग होऊ नये, सुरक्षतेसाठी sanitizer bottle, कापडी मास्क,hand gloves इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी संवाद च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके, पत्रकार राजेश जगताप, पत्रकार अशोक नाईक ,अरुण भावे काका उपस्थित होते.



टिप्पणी करे